Mahamandleshwar Janardan Hariji Maharaj गुरुंवर श्रद्धा व परमेश्वरावर विश्वास ठेवा : परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज


Believe in Guru and believe in God: His Holiness Mahamandleshwar Janardan Hariji Maharaj फैजपूर : परमेश्वर हा परमेश्वरच आहे. आपण गुरूंच्या आहारी एव्हढे जाऊ नका की भगवंताचा विसर पडेल. विवेक पूर्ण जीवन जगण्यासाठी आत्मचिंतन करणे म्हणजे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करणे आहे, असा मौलिक संदेश सरपंच संस्थानचे गादिपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज  (Mahamandleshwar Janardan Hariji Maharaj) यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आशीर्वाद देताना सांगितले. मी आणि माझे इष्ट एकच आहे हा भाव म्हणजे गुरुभक्ती असल्याचे त्यांनी सांगितले. संसारीक जीवनात आपण जे काही काम कराल ते मनापासून करा. गुरु गीता ही मा पार्वतीने भगवान शंकरांना विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा सार आहे.

राज्या-परराज्यातील भाविकांची उपस्थिती
संसारीक जीवनात पती-पत्नीच्या संवादातून वाद न होता गुरुगीते सारखे अमृत निर्माण होणे आवश्यक आहे. गुरु गीता ही गुरु शिष्याचे संबंध, नाते तसेच जीवन कसे जगावे हे शिकवते. गुरुपौर्णिमेनिमित्त दोन दिवसीय कार्यक्रमात गुरुपाद पूजन, मंत्र जप, भजन, महाराजांची तुला, महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संजीवनी रक्त पेढीच्या सहकार्याने भाविकांनी रक्तदान केले. यावेळी गुजरातसह मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातून भाविक भक्त मंदिरात उपस्थित होते. गुरुपौर्णिमेच्या हा कार्यक्रम लाईव्ह असल्याने जगभरातील असंख्य भाविक-भक्तांनी याचा लाभ घेतला.


फैजपूर शहरात चोरट्यांनी ऑटो पार्टसचे दुकान फोडले 

शिरपूरात गावठी कट्ट्यातून गोळी झाडत तरुणाची आत्महत्या

शिंदे सरकारने बदलला आधीच्या सरकारचा निर्णय : नगराध्यक्षांसह सरपंचांची आता जनतेतून होणार निवड

राज्यातील नागरीकांना मोठा दिलासा : पेट्रोल पाच तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !