भुसावळातून चोरट्यांनी दुचाकी लांबवली
भुसावळ : शहरात दुचाकी चोरीचे सत्र कायम असून आरओएच चीफ शेड शेडजवळून 18 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरी गेल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल
तक्रारदार व रेल्वे कर्मचारी शिवाजी रामभाऊ राऊत (रेल्वे कॉलनी, रेल्वे स्टेशन, बोदवड) यांनी त्यांच्या मालकिची दुचाकी (एम.एच.28 झेड.7129) ही भुसावळ शहरातील आरओएच चीफ शेड शेडजवळील सायकल स्टॅण्डजवळ लावली असता 6 जुलै रोजी दुपारी दोन ते तीन दरम्यान चोरीला गेली. या प्रकरणी त्यांनी शहर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवल्यावरून गुरुवारी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक विकास बाविस्कर करीत आहेत.
