संततधार पावसामुळे थेरोळा शेतीशिवारातील विहिर खचली


कुर्‍हाकाकोडा : येथून जवळच असलेल्या थेरोळा शेत-शिवारात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे सिमेंट काँक्रिटने बांधलेली विहिर पूर्णपणे खचल्याने शेतकर्‍याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

शेतकर्‍याचे मोठे आर्थिक नुकसान
कुर्‍हा, ता.मुक्ताईनगर येथील शेतकरी निलेश दशरथ बोरसे यांचे थेरोळा शेतीशिवारात शेत गट नं.142 आहे. शेतीच्या भरवश्यावरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करतात. यावर्षी त्यांनी आपल्या शेतात शासनाचा कोणत्याही प्रकारचा लाभ न घेता स्वखर्चाने विहिर खोदून ती बांधली मात्र गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पाऊसामुळे ही विहिर पूर्णपणे खचली आहे. पंधरा फूट झालेले बांधकाम पूर्णपणे विहिरीत पडले तर 51 फूट खोदलेली विहिर भरून फक्त सात आठ फुटच राहिली आहे. या घटनेमुळे शेतकरी निलेश बोरसे यांचे तब्बल चार ते पाच लाख रुपयांपर्यंतचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.


साडेसहा लाखांचा ऐवज असलेली पर्स कुर्ला एक्स्प्रेसमधून लांबवली


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !