अन्यायकारक वर्तणूक : भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात प्राध्यापकांचे काळ्या फिती लावून काम
भुसावळ : शहरातील भुसावळ कला, विज्ञान आणि पू.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापकांनी शनिवारी महाराष्ट्र शासनाच्या अन्याय जनक वर्तणुकीमुळे काळ्या फिती लावून काम केले. 71 दिवसांच्या परीक्षांच्या बहिष्कार कालावधीतील अर्धवट वेतनाची वाटणी, 18 जुलै 2018 यूजीसी रेगुलेशनची अर्धवट अंमलबजावणी, प्राध्यापकांचे प्रमोशनचे प्रश्न पेन्शनचे प्रश्न यासारख्या मागण्यांच्या संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाच्या विविध टप्प्यांन्वये शनिवारी सहाव्या टप्प्यात काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले तर सर्व प्राध्यापकांनी शासनाविरुद्ध घोषणाबाजी करून शासनाचा निषेध केला.
सहाव्या टप्प्यात काळ्या फिती लावून काम
महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ, एन.मुक्टो.केंद्रीय कार्यकारीणी तसेच जिल्हा कार्यकारीणीच्या आदेशानुसार संघटनेच्या स्थानिक शाखेतर्फे राबविण्यात येत असून याचाच आजचा सहाव्या टप्प्यात काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी प्रा.डॉ.ए.डी.गोस्वामी, प्रा.डॉ.पी.ए.अहिरे, प्रा.डॉ.एस.पी.झनके, प्रा.डॉ.जे.एफ.पाटील, डॉ.ममताबेन पाटील, डॉ.किरण वारके प्रा.डॉ.अनिल हिवाळे, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, डॉ.नीळकंठ भंगाळे आदींसह सर्व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व प्राध्यापकांनी शासनाविरुद्ध घोषणाबाजी करून शासनाचा निषेध केला.
