Eknathrao Khadse …तर शिंदे गटही होवू शकतो मनसेत विलीन : माजी मंत्री एकनाथराव खडसे
…then Shinde group can also merge with MNS: Former minister Eknathrao Khadse मुक्ताईनगर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची तब्बल दिड घेतलेली बैठक ही वैयक्तिक असलीतरी त्यात काय चर्चा झाली हे दोघे सांगू शकतील मात्र हायकोर्टात शिंदे गटाबाबत सुनावणी सुरू असून त्यात वेळप्रसंगी निर्णय घेण्याची वेळ आली तर शिंदे गटाला मनसे वा प्रहारमध्ये विलीन व्हावे लागेल अन्यथा ते अपात्र ठरतील, अशी शक्यता माजी मंत्री महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी शनिवारी येथे व्यक्त केली. मुक्ताईनगरात माध्यमांशी बोलताना त्यांनी दिड तासांच्या भेटीबाबत अनेक तर्क-वितर्क असल्याचे सूचक विधानही केले.
अनुभवाचा फायदा होण्यासाठी दिली चिठ्ठी
फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या चिठ्ठीचे प्रकरण गाजत असतानाच त्यावरही खडसेंनी आपले मत स्पष्ट केले. ते म्हणाले की, राजकारणामध्ये चिठ्ठी देण्याचे प्रकार हे चालत राहतात. कधी ते लेटर तर कधी ती प्रेमाची चिठ्ठी असते तर कधी सूचना असतात. देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करण्याची संधी त्यांच्या पक्षाने दिली आहे. त्यामुळे आपल्या अनुभवाचा फायदा मुख्यमंत्र्यांना व्हावा म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना चिठ्ठीद्वारे सूचना केली असेल, असे म्हणत राष्ट्रवादीची ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

अनेक चर्चांना उधाण
मनसेप्रमुख राज ठाकरे व फडणवीस यांच्यातील दिड तासांच्या भेटीतील चर्चेवर बोलताना खडसे यांनी सांगितले की, त्यांच्यातील चर्चा त्यांनाच ठाऊक असलीतरी या चर्चेबद्दल उधाण आल्याचे त्यांनी सांगितले. अशा भेटी राजकारणात या होत असतात मात्र दिड तास देवेंद्रजी तेथे थांबल्याने त्यात मनसेने सरकारमध्ये सामील व्हावे की, सुप्रीम कोर्टाचा निर्णय येणार असल्याने शिंदे गटाला मनसे वा प्रहारमध्ये विलीन करावे ? याबाबत तर चर्चा झाली नाही ना? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.