पुरी-अजमेर एक्स्प्रेसमधून महिला प्रवाशाचे पाच लाखांचे दागिने लांबवले


Jewelery Worth Five Lakhs Of a Female Passenger Was Stolen From The Puri-Ajmer Express भुसावळ : पुरी-अजमेर एक्स्प्रेसने बडनेरा ते सूरत असा प्रवास करणार्‍या सूरतच्या महिलेची पर्स चोरट्याने भुसावळ-जळगाव दरम्यान लांबवली. त्या पर्समध्ये सोन्याच्या दागिण्यांसह 18 हजार रुपये रोख मिळून 5 लाखांचा मुद्देमाल होता. ही घटना मंगळवारी रात्री 2.30 ते 3.30 वाजेदरम्यान घडली.

दुचाकीच्या डिक्कीतून सहा लाख अलगद लांबवले : बंटी-बबलीला शहादा पोलिसांकडून अखेर बेड्या

रेल्वे प्रवास झाला असुरक्षित
सूरत येथील रहिवासी शहेरबानू अब्दुल कादर पटेल या बडनेरा येथे विवाहासाठी गेल्या होत्या. तेथून परत सूरत जातांना त्या पुरी- अजमेर एक्स्प्रेसच्या एसी डब्यातून प्रवास करत होत्या. भुसावळ येईपर्यंत रात्री 2.30 वाजेपर्यंत त्या जागीच होत्या. भुसावळ स्थानक सोडल्यावर त्यांना झोप लागली. ही संधी साधत चोरट्याने त्यांची पर्स लांबविली. त्यात 5 लाख 22 हजार 200 रूपयांचा ऐवज होता. जळगावजवळ गाडी आल्यावर पटेल यांना जाग आली. तेव्हा पर्स चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ गाडीतील टीसीला माहिती दिली. टीसीने त्यांना नंदूरबार येथे उतरण्याचा सल्ला दिला मात्र तब्येत बरी नसल्याने त्यांनी सूरत येथे लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सूरत येथून गुरूवारी हा गुन्हा शून्य क्रमांकाने भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग झाला.


शिंदे सरकारची मोठी घोषणा : यंदाच्या गणेशोत्सवासह दहिहंडीवर कुठलेही निर्बंध नाहीच


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !