दुचाकीच्या डिक्कीतून सहा लाख अलगद लांबवले : बंटी-बबलीला शहादा पोलिसांकडून अखेर बेड्या


Theft of six lakhs from the trunk of a two-wheeler: Two of the Boch Bachchan gang in the net शहादा : सहा लाखांच्या चोरी प्रकरणी बोल बच्चन गँगमधील बंटी-बबलीच्या मुसक्या आवळण्यात यंत्रणेला यश आले आहे. अर्चनाबेन अमितभाई राठोड हिला गुप्त माहितीच्या आधारावर शहादा पोलिसांनी कुबेरनगर-अहमदाबाद येथून तर दुसरा आरोपी बंटी अर्थात पप्पू इंद्रीकर (रा.कुबेरनगर, अहमदाबाद) हा बेटावद, ता.शिंदखेडा येथून अटक केली आहे. आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे तर अन्य तिघे पसार आरोपींचा कसून शोध सुरू आहे.

बंडखोरांपैकी एकही निवडून आला तर राजकारण सोडेल : संजय सावंत

असे आहे नेमके प्रकरण
13 मे 2022 रोजी शहरातील डोंगरगाव रस्त्यानजीक श्रीहरी हॉस्पिटल समोर दुपारी एक वाजेच्या सुमारास खेतिया येथील व्यापारी सुभाष कोठारी हे दुचाकीवरून जात असताना दोन दुचाकींवर आललेया बंटी-बबली बोलबच्चन गँग मधील चार जणांनी गाडीला कट का मारला असे सांगून भांडण सुरु केले. बबलीने व्यापारी सुभाष कोठारी यांच्या दुचाकीची चावी काढून घेतली व संधी साधत मोटरसायकलच्या डिक्कीतून पिशवीत असलेली 6 लाख 33 हजार 140 रुपयांची रोकड घेऊन पळ काढला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर व्यापार्‍याने संशयीताचे वर्णन पोलिसांना कथन केले होते.

गोपनीय माहितीवरून कारवाई
घटनेला दोन महिने उलटल्यानंतर पोलीस उपअधीक्षक श्रीकांत घुमरे, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदर घटनेतील आरोपी अहमदाबाद येथे असल्याची माहिती मिळाली. उपनिरीक्षक जितेंद्र पाटील, पोलिस कर्मचारी नागलोत, शिरसाठ, निर्मला पावरा यांच्या पथकाने अहमदाबाद पोलिसांच्या सहकार्याने या गँगमधील बबली अर्चनाबेन अमितभाई राठोड हीस तिच्या राहत्या घरातून मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली तर दुसरा आरोपी बंटी अर्थात पप्पू इंद्रीकर (रा.कुबेरनगर, अहमदाबाद) यास बेटावद, ता.शिंदखेडा येथून अटक करण्यात आली. या चोरीतील अन्य आरोपी बंटी पप्पू इंद्रेकर (26), रोजनिश धर्मु गुमाणे (38), सतीश ललिया गुमाने (40, रा.कुबेरनगर-अहमदाबाद) हे तिघेही पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

जळगावात चोरट्यांनी चोरीसाठी चक्क घराची भिंत फोडली : त्रिकुटाविरोधात गुन्हा


कॉपी करू नका.