Girish Mahajan said: Eknath Shinde is the true Shiv Sainik गिरीश महाजन म्हणाले : एकनाथ शिंदे हेच खरे शिवसैनिक


Girish Mahajan said: Eknath Shinde is the true Shiv Sainik नंदुरबार : शिवसेना सोडून बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे हेच खरे शिवसैनिक आहेत. फोडाफोडीच्या राजकारणाला भाजप जबाबदार नाही. शिवसेनेची खदखद बंडखोरीतून प्रकट झाली. शिवसेनेेच्या फुटीला उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत, असा आरोप माजी मंत्री गिरीश महाजन यांनी येथे भाजपा कार्यालयात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केला.

मी भाजपाचा अध्यक्ष नाही
शिवसेना व भाजपची युती असल्याने नंदुरबारच्या जिल्हा परिषदेसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेसोबतच निवडणूक लढवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्नशील राहू. तसेच मंत्री मंडळाच्या विस्तारासंदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतले जातील. राज्यपालांच्या आमदारांच्या यादीत नंदुरबारचा समावेश आहे का? यावर ते म्हणाले, मी भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष नाही, अशी मिश्कील प्रतिक्रिया देऊन त्यांनी वेळ मारून नेली. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी उपस्थित होते.

बंडखोरीतून संताप पडला बाहेर
महाजन म्हणाले, उद्धव ठाकरे हे सोशल मीडियाच्या माध्यमातूनच जनतेशी संवाद साधत होते. कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदारांना ते भेटतच नव्हते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर ठाकरे चालत नव्हते. हा सर्व संताप बंडखोरीतून बाहेर पडला. मात्र एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी आहे,असेही ते या वेळी म्हणाले.

आता तर कहरच झाला राव ! नावरेच्या गणेश मिस्तरीला सोळाव्यांदा झाला सर्पदंश


कॉपी करू नका.