Wife Killed Due To Suspicion Of Character : Incident in Gorgaon Shivar चारीत्र्याच्या संशयातून पत्नीची केली हत्या : गोरगावले शिवारातील घटना
डोक्यात मारली कोळपणी : चोपडा ग्रामीण पोलिसात आरोपी पतीविरोधात गुन्हा
Wife Killed Due To Suspicion Of Character : Incident in Gorgaon Shivar चोपडा : पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेतल्याने झालेल्या वादात पतीने पत्नीच्या डोक्यात कोळपणी मारल्याने पत्नीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेनंतर आरोपी पती पसार झाला आहे. ही घटना चोपडा तालुक्यातील कठोरा शिवारात बुधवार, 27 जुलै रोजी रात्री घडली. गुरुवारी आरोपीविरोधात चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. लिलाबाई ग्यानसिंग बारेला (25, रा.धवली ता.वरला, जि.बडवानी, ह.मु.गोरगावले शिवार, चोपडा) असे मृत विवाहिते तर ग्यानसिंग बारेला असे आरोपी पतीचे नाव आहे.
हत्येने गोरगावले शिवार हादरले
आरोपी ग्यानसिंग हा पत्नी लिलाबाई बारेला यांच्या चारीत्र्यावर नेहमीच संशय घेत असल्याने दाम्पत्यात भांडण होत होते मात्र गुरुवारी रात्री पुन्हा त्याच कारणावरून भांडण झाल्याने वाद टोकाला गेल्याने पत्नी लिलाबाई बारेला यांच्या डोक्यात कोळपणी मारल्याने गंभीर जखम झाल्याने त्यांचा मृत्यू झाला तर आरोपी पती खुनानंतर पसार झाला. या प्रकरणी फिर्यादी टेम्बर्या मन्साराम बारेला (वय 23, रा.रा.धवली ता.वरला जि.बडवानी,सध्या गोरगावले शिवार, चोपडा) यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून भांडण झाल्याने आरोपी याने रागाच्या भरात पत्नी लीलाबाई बारेला हिच्या डाव्याकानावर व कानाच्या मागे लोखंडी कोळपणीने वार केला. दरम्यान, लीलाबाई या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, आरोपी ग्यानसिंग बारेला हा पसार झाला आहे. या प्रकरणी टेम्बर्या मन्साराम बारेला यांनी चोपडा ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहा.पोलिस अधीक्षक ऋषिकेश रावले, पोलिस निरीक्षक देविदास कुनगर यांनी भेट देत माहिती जाणून घेतली.

शिक्षक घोटाळा प्रकरण : अर्पिता मुखर्जीच्या घरातून 20 कोटींच्या रोकडसह कोट्यवधींचे सोने जप्त
