Eknathrav Khadse नाथाभाऊ स्पष्टच म्हणाले : राजकीय द्वेषापोटी जळगाव दुध संघ चौकशीसाठी समिती : निर्णयाविरोधात खंडपीठात याचिका


Nathabhau Clearly Said : Committee to investigate Jalgaon Dudh Sangh due to political hatred: Petition in the bench against the Decision  जळगाव : केवळ राजकीय द्वेषापोटी जळगाव दुध संघावर समिती नेमण्यात आली आहे मात्र मुळात संचालक मंडळ बरखास्त करायचे होते तर त्याची चौकशी होणे, त्यांच्यावर आरोप सिद्ध होणे आवश्यक होते. परंतु असे काहीही झालेले नाही. ही कारवाई बेकायदेशीर आणि राजकीय सूडबुद्धीने करण्यात आल्याने त्या विरोधात खंडपीठात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे दिली. नाथाभाऊ (MLA Eknathrav Khadse) म्हणाले की, राजकीय हेतूने व द्वेषापोटी आमदार गिरीश महाजन, एन.जी.पाटील यांनी दिलेल्या अर्जावर मुख्यमंत्री यांनी समिती नेमली. मी आव्हान देतो, कुणीही यावे आणि दूध संघात पाहणी करावी शिवाय सरकारच्या तपासणीत आजवर कोणतेही गंभीर दोष आढळून आलेला नाही, असेही त्यांनी शुक्रवारी जळगावात आयोजित पत्रकार परीषदेत सांगितले.

तर सरकार कोसळणार !
राज्यातील शिवसेनेत बंड केल्यानंतर शिंदे सेनेने भाजपाची हातमिळवणी केली मात्र आता जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही तोवर मंत्रीमंडळ विस्तार होऊ नये, असे मुख्यमंत्र्यांना वाटत आहे कारण न्यायालयाचा निर्णय विरोधात गेला तर तर सरकार केव्हाळी कोसळू शकते, असेही खडसे (MLA Eknathrav Khadse)  यांनी सांगितले.

25 कोटी नफ्यापर्यंत दुध संघ पोहोचणार : खडसे
माजी मंत्री खडसे (MLA Eknathrav Khadse)  म्हणाले, जळगाव जिल्हा दूध विकास संघावर प्रशासक मंडळ नियुक्ती करणे आणि दूध संघावरील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमणूक करण्यात आली. दूध संघ 1995 मध्ये विक्रीस निघाला होता. अशा स्थितीत मी मंत्री असताना तो एननडीडीबीकडे सोपविला. पुढे लोकनियुक्त संचालक मंडळाची निवड करून त्यांनी दूध संघाची स्थिती सुधारली. आज दूध संघाचे भाग भांडवल 15 कोटींच्या वर गेले आहे. आज दररोज 4 लाख लीटर दूध रोज येते. एकूण 25 कोटी नफ्यापर्यंत दूध संघ पोहोचणार आहे, असा दावाही खडसे यांनी केला.

बडतर्फ कर्मचार्‍याच्या अर्जावर चौकशी व्हायला हवी
खडसे (MLA Eknathrav Khadse)  पुढे म्हणाले, 1999 मध्ये एन.जी.पाटील कार्यरत होते. विविध कारणांसाठी त्यांना बडतर्फ करण्यात आले. आजवर त्यांनी 50 तक्रारी केल्या असून बडतर्फ कर्मचार्‍याच्या अर्जावर चौकशी नेमण्याआधी याचा अभ्यास व्हायला हवा होता मात्र तसे घडले नाही. दूध संघात एकाही व्यक्तीची भरती झाली नाही तर भ्रष्टाचार होणार कसा? निवड झालेल्या उमेदवारांची यादी न्यायालयात गेली असून हा प्रश्न न्याय प्रविष्ठ आहे, असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले.

उच्च न्यायालयात दावा दाखल
दूध संघाच्या निवडणुका जाहीर झाल्या असून न्यायालयाने 30 सप्टेंबरपर्यंत निवडणुकांना स्थगिती दिली आहे. सहकार विभागाच्या एका नियमानुसार निवडणूक होईपर्यंत संचालक मंडळ कार्यरत राहू शकते. उच्च न्यायालयात दावा दाखल केला असून न्यायालयाने दावा स्वीकारला आहे. सोमवारी त्यावर कामकाज होणार असल्याची माहिती खडसे (MLA Eknathrav Khadse)  यांनी पत्रकार परीषदेत दिली.

चारीत्र्याच्या संशयातून पत्नीची केली हत्या : गोरगावले शिवारातील घटना

मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !