‘हर घर तिरंगा’ अभियान अंतर्गत साई निर्मल फाउंडेशनतर्फे मोफत ध्वज वाटप


भुसावळ : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या वतीने ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशभरात 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवले जात आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार हे अभियान राबविण्याचे आवाहन केल्यानंतर भुसावळ येथील साई निर्मल फाउंडेशनतर्फे प्रभाग 23 मध्ये मोफत तिरंगा झेंडे वाटप करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी संस्थाध्यक्ष शिशिर जावळे, प्रकल्प प्रमुख चंद्रशेखर पाटील, गोपाळ वाणी, बळीराम पवार, सतीश विष्णू मोतीवाले, संजय धांडे, राजेंद्र दुसाणे, लक्ष्मण वाढे, देवेंद्र वराडे, अशोक बिलवाल, पराग चौधरी, आर.के.कोडी, कपिल पहुरकर, मोहन कासार व इतर नागरीक उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !