भुसावळात नगरसेवकांनी स्वखर्चातून सुरू केली घंटागाडी


भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक 20 चे नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर यांनी स्वखर्चातून प्रभागातील नागरीकांसाठी घंटागाडी सुरू कली आहे. पालिकेकडून कचरा संकलन होत असलेतरी घंटागाडी अनियमित येत असल्याने प्रभागातील नागरीकांची होणारी गैरसोय पाहता ठाकूर यांनी पुढाकार घेत घंटागाडी सुरू कली आहे. नागरीकांनी ओला व सुका कचर्‍याचे वर्गीकरण करून कचरा घंटागाडीत टाकावा, असे आवाहन नगरसेवक ठाकूर यांनी केले आहे. प्रभाग स्वच्छ ठेवण्याची जवाबदारी पालिकेप्रमाणे नागरीकांचीदेखील असून नागरीकांनी स्वच्छता राखण्याकामी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !