Gondia Train Accident News मोठी बातमी : गाेंंदियानजीक मालगाडीवर प्रवासी रेल्वेगाडी धडकली : 50 प्रवासी जखमी
Gondia Train Accident News गोंदिया : गोंदिया शहरानजीक भगत की कोठी या रेल्वे गाडीवर मालगाडी धडकल्याने झालेल्या अपघातात 50 हून अधिक प्रवासी जखमी झाले. हा अपघात बुधवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास घडला. या अपघातामुळे प्रवासी गाडीची एक बोगी रुळावरून घसरली. ट्रेन छत्तीसगडच्या बिलासपूरहून राजस्थानच्या जोधपूरला जात असल्याचे सांगण्यात आले.
अपघाताचे नेमके कारण अस्पष्ट
रायपूर येथून नागपूरच्या दिशेने धावणा-या ‘भगत की कोठी’ या रेल्वे गाडीने पुढे धावणार्या मालगाडीला गाडीने धडक दिल्याचे वृत्त आहे. या अपघातात पन्नास पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले असून रेल्वे प्रशासनातर्फे मदत सुरू करण्यात आली. जख1मी प्रवाशांवर सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमधे उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरून जात असताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघाताची रेल्वे प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

