वरणगावातील पाणीप्रश्नी मुख्यमंत्री शिंदे सरकारला साकडे
Chief Minister Shinde will hand over the water issue in Warangaon to the government भुसावळ : तालुक्यातील वरणगाव शहराच्या विकासासाठी निधी मंजूर करावा तसेच पाणीपुरवठा योजनेचा तिढा मार्गी लावावा, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी प्रत्यक्ष मुंबईत भेट घेवून केली. मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घयेण्याचे आश्वासन प्रसंगी देण्यात आले.
या मागण्यांसाठी घातले साकडे
पाणीपुरवठा योजनेचे काम ठेकेदाराने बंद केले असून ते तत्काळ जलद गतीने सुरू करावे, वरणगाव शहरात भूमिगत गटारींचा 70 कोटींचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करावा, तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिरास पर्यटन खात्यांतर्गत मंजूर झालेला दोन कोटी 74 लाखांचा निधी वितरीत करण्यात यावा, शहरात सामाजिक सभागृह, नवीन भागात गटारी मंजूर कराव्यात, वरणगाव शहरातील भोगावती नदी घाटाला निधी मंजूर करावा, श्री छत्रपती शिवाजी स्मारकासाठी निधी मंजूर करावा, अल्पसंख्यांक निधी अंतर्गत शहरात गंगाराम कॉलनी अक्सानगर, उमर कॉलनीत शादीखाना हॉल मंजूर करावा, वरणगावला तालुक्याचा दर्जा द्यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार भरत गोगावले यासह मंत्री उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरणगाव शहरातील जनहिताच्या समस्या त्वरीत मार्गी लावण्यासह शहर विकासासाठी निधीची कमतरता भासू न देण्याचे आश्वासन दिले.

