सावधगिरी बाळगल्यास अप्रिय घटनांना आळा : समुपदेशक आरती चौधरी

आत्मसंरक्षण व सायबर सुरक्षा विषयावर समुपदेशन ; इनरव्हील क्लब ऑफ रेलसिटीचा उपक्रम


भुसावळ : सावधगिरी बाळगून कान उघडे ठेवून डोळ्यांनी जवळच्या घटना पाहिल्यास निश्चितच अप्रिय घटनांना आळा बसेल मात्र अशाही स्थितीत काही वाईट प्रसंग उद्भवात तर हिंमतीने प्रतिकार करा, असे आवाहन समुपदेशक आरती चौधरी यांनी विद्यार्थिनींना केले. शहरातील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात इनरव्हील क्लब ऑफ रेल सिटी भुसावळतर्फे आत्मसंरक्षण व सायबर सुरक्षा या विषयावरील कार्यशाळेत त्या बोलत होत्या.

तर टळतील धोके
अध्यक्षा प्रतीक्षा पाटील, रेवती मांडे, मोना भंगाळे, डॉ. मृणाल पाटील, सुनीता पाचपांडे, प्रभा पाटील आदी उपस्थित होते. बदलणार्‍या काळात मुलींनी स्वत:चे संरक्षण कसे करावे? समाजात वावरताना कशी काळजी घ्यावी? यावर आरती चौधरींनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, छोट्या-छोट्या गोष्टी आहेत तिथे आपण काळजी घेतली तर धोके टाळू शकतो. कारण महिलांवर होणार्‍या अत्याचाराला वय नसते. लहान मुलींपासून ते वृद्ध महिलादेखील अत्याचाराचा बळी ठरल्या आहेत. त्यामुळे युवतींनी स्वतःला सक्षम करणे गरजेचे आहे. कोणतीही घटना घडायची वाट न पहाता धोक्याची सूचना मिळताच सावध व्हा. सार्वजनिक ठिकाणी आपल्या वर्तणुकीचे भान ठेवा, असा सल्ला देखील दिला.

छायाचित्र अपलोड करताना काळजी घ्या
प्रत्येक मुलीने घराबाहेर पडताना स्वत:जवळ सेफ्टी पिन, हेअर पिन, पेन, बॅग सोबत ठेवावी. या साधनाचा वापर करून तुम्ही ऐनवेळी स्वत:चा बचाव करू शकतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मानसिकदृष्ट्या खंबीर व्हा. इंटरनेटवर सोशल मीडियाचा सुरक्षित वापर करा. ई-मेल, फेसबुक यावर फोटो अपलोड करताना खबरदारी घ्यावी. फेसबुक, ई-मेलचे पासवर्ड कोणालाही सांगू नये, असा सल्ला दिला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !