शिक्षकांच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागात शिक्षणाची हेळसांड
तात्पुरता स्वरूपात पदवीधारकांना उमेदवार नियुक्तीचे अधिकार द्यावेत : आमदार चंद्रकांत पाटील यांचे जि.प.मुख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदन
मुक्ताईनगर : जळगाव जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागात शिक्षणाची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. जिल्हा परीषदेच्या ज्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. त्या शाळांच्या ग्रामपंचायतींना तात्पुरत्या स्वरूपात स्थानिक शैक्षणिक पदवीधारक उमेदवारांच्या नियुक्तीचे अधिकार देऊन, शिक्षकांचे मानधन केंद्र शासनाच्या ग्रामपंचायत स्तरावरील 15 वा वित्त आयोग या निधीतील 25 टक्के शिक्षण, उपजीविका तरतुदीतून शिक्षकांच्या मानधनाची तरतूद करण्यात यावी अशा आशयाचे पत्र मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जळगाव जिल्हा परीषदेचे कार्यकारी मुख्याधिकारी पंकज आशिया यांना दिले.
शिक्षणाचा प्रश्न तत्काळ सोडवावा
आमदार पाटील यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागात शिक्षणाची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. जिल्हा परीषदेच्या ज्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. त्या शाळांच्या ग्रामपंचायतींना तात्पुरत्या स्वरूपात स्थानिक शैक्षणिक पदवीधारक उमेदवारांच्या नियुक्तीचे अधिकार देऊन, शिक्षकांचे मानधन केंद्र शासनाच्या ग्रामपंचायत स्तरावरील 15 वा वित्त आयोग या निधीतील 25 टक्के शिक्षण, उपजीविका तरतुदीतून शिक्षकांच्या मानधनाची तरतूद केल्यास ज्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे त्यांना रोजगार मिळेल आणि ग्रामीण भागातील शिक्षणाचा प्रश्न सुटणार आहे. जिल्हा परीषद, जळगाव प्रशासनाने 15 व्या वित्त आयोगाच्या कृती आराखड्यातील तरतुदींबाबत गांभीर्याने विचार करावा व ग्रामीण भागातील शिक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावा, असे पत्रात नमूद केले आहे.

