A big opportunity for unemployed Youth : 7000 posts will be recruited in the police force बेरोजगार तरुणांना मोठी संधी : पोलिस दलात सात हजार जागांवर होणार भरती
A big opportunity for unemployed youth: 7000 posts will be recruited in the police force जळगाव : तुम्ही पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. राज्यातील गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती केली जात असून त्याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिल्याने तरुणाईच्या वर्तुळात समाधान व्यक्त होत आहे. विधानसभेत लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना फडणवीस यांनी माहिती दिली आहे.
लवकरच भरतीची प्रक्रिया राबवली जाणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील विविध शहरांमध्ये पोलिस विभागात मनुष्य बळाची कमतरता पाहता लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले तसेच आणखी सात हजार पोलिसांची भरती केली तात असून त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

यापुढे एक अधिकारी एकाच पदावर अधिक काळ राहणार नाही
नवी मुंबई परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास वरिष्ठ अधिकार्यांना जबाबदार धरले जाईल. तसेच एका अधिकार्यांस एकाच पदावर अथवा शहरात जास्त काळ नियुक्ती दिली जाऊ नये, याबाबत दक्षता घेतली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याबाबत सदस्या मंदा म्हात्रे यांनी चर्चा उपस्थित केली होती.
शारीरिक चाचणी पहिल्यांदाच होणार
शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरीक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
50 गुणांसाठी होणार चाचणी परीक्षा
पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत.
बहुपर्यायी असतील प्रश्न
शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील, लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील. लेखी चाचणी मध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. परीक्षामराठी भाषेत घेण्यात येईल. तसेच या लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. सदरहू पोलिस भरतीमधील लेखी परिक्षा विशेष बाब म्हणून ओएमआर पध्दतीने घेण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे.
