जनसामान्यांचे आशीर्वादच लढण्यासाठी बळ देतात : अॅड.रोहिणी खडसे
मुक्ताईनगर : जनसामान्यांचे आशीर्वादच सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढण्यासाठी बळ देतात, असे विचार जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे यांनी येथे व्यक्त केले. जन संवाद यात्रेच्या नवव्या दिवशी पळसखेड, ता.बोदवड येथे अॅड.खडसे बोलत होत्या. प्रसंगी बोरगावसाठी राहिलेला दिड किलोमीटर अंतराचा रस्ता लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन यात्रेप्रसंगी देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी यात्राप्रमुख ईश्वर रहाणे, बोदवड राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आबा पाटील, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, तालुकाध्यक्ष विलास राजपूत, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रदीप बडगुजर, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, बाजार समिती संचालक रामदास पाटील, नगरसेवक भरत अप्पा पाटील, राकाँ गटनेते जाफर शेख, भागवत टीकारे, अनिल वराडे (घाणखेड), अनिल पाटील (वरखेड), रामराव पाटील (सरपंच हिंगणे), दीपक झंबड, युवक तालुका अध्यक्ष विनोद कोळी व पळासखेडा, मुक्तळ, बोरगाव, वाकी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

