Farmers demand compensation for cattle killed by lumpy लंपीने दगावलेल्या गुरांची भरपाईची शेतकर्यांची मागणी
मस्कावदसह खिरोद्यात कृषी मंत्र्यांची भेट : जिल्हाधिकार्यांना देणार अहवाल
Farmers demand compensation for cattle killed by lumpy सावदा : लंपी आजाराने दगावलेल्या गुरांची शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या परीसरातील शेतकर्यांनी गुरुवारी केली. मस्कावदसह खिरोदा येथे कृषी मंत्र्यांनी भेट देवून पाहणी केली.
यांची होती उपस्थिती
मस्कावदला सरपंच, भाजपचे कार्यकर्ते तसेच खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेश पाटील, आमदार राजूमामा भोळे, जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष नंदू महाजन, श्रीकांत महाजन, भाजपचे, इतर पदाधिकारी, रेखा बोंडे, नेहा गाजरे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जे.के.भारंबे, संतोष परदेशी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

खिरोदा येथे यांची उपस्थिती
दरम्यान, खिरोद्यात रावेरचे आमदार शिरीष चौधरी, सामाजिक कार्यकर्ते धनंजय शिरीष चौधरी, तुकाराम बोरोले यांनी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन जनता शिक्षण मंडळाच्या गेट जवळ स्वागत केले. खिरोदा येथे पशूवैद्यकीय अधिकार्यांनी शासकीय औषधांचा पुरवठा न करता पैशांची मागणी केल्याचा आरोप केल्याने कृषी मंत्री चांगलेच संतप्त झाले. मंत्री विखे पाटील यांनी जळगाव येथे जिल्हाधिर्यांसोबत पशू वैद्यकीय अधिकार्यांची बैठक आयोजित केल्याचे सांगत या बैठकीनंतर आपण शासन दरबारी मदतीसाठी अधिवेशनात प्रश्न मांडून न्याय मिळवून देणार असल्याचे भूमिका मांडली.
