भुसावळात अनोळखी युवकाचा मृत्यू
भुसावळ : बसस्थानकामागील रेल्वेच्या तिकीट खिडकीकडे जाणार्या मार्गावर पिंपळाच्या झाडाजवळ एका 25 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह शनिवारी सायंकाळी 4.45 वाजेच्या सुमारास आढळला. याप्रकरणी रीक्षा चालक आरीफ खान इसाकखान यांनी दिलेल्या माहितीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अनोळखी युवकाचा मृत्यू हा एखाद्या जुन्या आजाराने झाल्याचा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अनिल अडकमोल पुढील तपास करीत आहे.
