Nathabhau Always Gave Justice To All Castes And Religions : Adv. Rohini Khadse नाथाभाऊंनी नेहमीच सर्वच जाती-धर्माला दिला न्याय : अॅड.रोहिणी खडसे
Nathabhau Always Gave Justice To All Castes And Religions : Adv. Rohini Khadse मुक्ताईनगर : गेल्या 30 वर्षांपासून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सर्व जाती-धर्माला न्याय देऊन राजकारण केले. नाथाभाऊंनी काम करत असताना कधीच जाती-पातीचा विचार केला नाही. केवळ विकास हा एकच ध्यास मनाशी घेऊन त्यांनी मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न केलेत. पाटबंधारे मंत्री असताना कुर्हा परीसरासाठी कुर्हा-इस्लामपूर सिंचन योजना मंजूर करून परीसर आणि परीसरातील शेतकरी सुखी आणि समृद्ध होऊन हरीतक्रांतीचे स्वप्न पाहिले. निधीअभावी आजही अपूर्णावस्थेत असलेली ही योजना फक्त नाथाभाऊच पूर्ण करू शकतात, असे अॅड.रोहिणी खडसे यांनी जलसंवाद यात्रेदरम्यान मतदारांशी बोलताना आवर्जून त्यांनी सांगितले.
दुर्गम भागात पोहोचवली विकासगंगा
अॅड.रोहिणी खडसे म्हणाल्या की, या परीसरात जी विकासकामे दिसताय, मग शाळा खोल्या असो, की गावा-गावांना जोडणारे रस्ते, बुद्ध विहार असो की समाजमंदिरे ही कामे भाऊंनी केली आहे. मात्र गेल्या तीन वर्षांपासून तालुक्याचा विकास थांबला आहे परंतु आता पुन्हा एकनाथराव खडसे हे विधानपरीषदेचे आमदार झाले आहेत त्यांच्या माध्यमातून रोहिणी खडसे या पाठपुरावा करून राहिलेली विकास कामे पूर्ण करतील, असा आशावाद जन संवाद यात्रेचे यात्राप्रमुख निवृत्ती पाटील यांनी व्यक्त केले.

ग्रामस्थांचा मोठ्या संख्येने सहभाग
जनसंवाद दौर्याच्या 12व्या दिवशी तालखेडा, धुळे पावरी वाडा, चिंचखेडा, सुळे, रिगांव,भोटा इ गावातील नागरिकांशी अॅड.खडसे यांनी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. जनसंवाद यात्रेत धुळे, चिंचखेडा खुर्द, भोटा, रीगाव व सुळे ग्रामस्थ सहभागी झाले.
