अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना लवकरच नुकसान भरभाई


सावदा : जळगाव जिल्ह्यात जून ते ऑगस्ट 2022 दरम्यान झालेली अतिवृष्टी व उद्भवलेल्या पूर परीस्थितीमुळे बाधीत शेतकर्‍यांना वाढीव दराने मदत जाहीर करावी म्हणून मदतनिधीची मागणी करण्यात आली. त्यानुसार 10 ऑगस्टच्या मंत्री मंडळ बैठकीत जून ते ऑक्टोबर 2022 दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरीता बाधीत शेतकर्‍यांना वाढीव स्वरूपात मदत प्रदान करण्यास मान्यता देण्यात आली. या अनुषंगाने ही मदत या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मिळणार आहे.

केळी पिकांना सर्वाधिक मोठा फटका
रावेर तालुक्यात जून महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. त्यानुसार 6 जून 2022 रोजी 25 गावातील एक हजार 356 शेतकर्‍यांच्या 794 हेक्टर शेत बागायतींचे नुकसान झाले. 11 जून 2022 रोजी 15 गावातील 400 शेतकर्‍यांच्या 331 हेक्टर शेत बागायतीचे नुकसान, असे दोन्ही मिळून 40 गावातील एक हजार 756 शेतकर्‍यांचे एक हजार 125 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले.




लवकरच मिळणार भरपाई
या एक हजार 756 नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना बागायती शेतकरी हेक्टर 27 हजार नुकसान भरभाई लवकरच मिळणार आहे. याबाबत प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !