भुसावळात आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या विविध कार्यक्रम


भुसावळ : भुसावळचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार, 11 डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात बुधवारी सकाळी नऊ वाजता साकेगांव येथे आमदारांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे रजनी सावकारे यांच्या नेतृत्वात भगीरथी प्राथमिक विद्यामंदिरात सदिच्छा भेट व शालेय शैक्षणिक साहित्यासह विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येईल व
सकाळी 10 वाजता खडका येथे श्रीमद् भागवत सप्ताहात आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते आरती व पूजनाचा कार्यक्रम होईल. सकाळी 10.30 वाजता नगरपालिका शाळा क्रमांक दोनमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे होणार आहे. सकाळी 11 वाजता भुसावळ नगरपालिका दवाखान्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढी, जळगावतर्फे करण्यात आले असून सकाळी 11.30 वाजता भव्य नेत्र तपासणी शिबिर जामनेर रोडवरील आमदारांच्या संपर्क कार्यालयाबाहेर होईल. या कार्यक्रमाचे आयोजक डॉ.शैलेंद्र बर्‍हाटे आहेत.

वरणगावकरांना टँकर देणार भेट
बुधवारी दुपारी एक वाजता वरणगाव येथे आमदार संजय सावकारे यांच्यातर्फे पाण्याचे टँकर सप्रेम भेट व लोकार्पण सोहळा होणार आहे. यावेळी नगरसेवक नितीन माळी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी पाच वाजता खडका येथील साईबाबा मंदिर ग्रृपतर्फे वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळा भैय्या महाजन व दारा पाटील
यांच्यातर्फे होईल तसेच सायंकाळी सात वाजता शहरातील बियाणी स्कुलमध्ये आमदारांचा अभीष्टचिंतन सोहळा होणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील ठिकठिकाणचे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच आमदारांवर प्रेम करणारे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !