महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांसाठी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मदत
वरणगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील बसस्थानक चौकात राष्ट्रवादी तालुका आणि वरणगाव शहर कार्यकारणीच्या नियोजनानुसार शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अवकाळी पावसाने राज्यातला शेतकरी उद्ध्वस्त झाल्याने धनराशी गोळा करीत ही रक्कम जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्रभैया पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.
14 हजारांची रक्कम जिल्हाध्यक्षांकडे सुपूर्द
संपूर्ण महाराष्ट्रात यंदाच्या पावसाने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून सर्वत्र दुष्काळजन्य परीस्थीती निर्माण झाल्याने राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक यांचा वाढदिवस असल्याने पक्षातील वरणगाव येथील कार्यकर्त्यांनी 14 हजारांची रक्कम राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांकडे सोपवली. यावेळी नगरसेवक राजेंद्र चौधरी, नगरसेवक गणेश चौधरी, समाधान चौधरी, रवींद्र सोनवणे, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, वरणगाव शहराध्यक्ष संतोष माळी, पप्पू जकातदार, समाधान चौधरी, प्रकाश नारखेडे, गजानन वंजारी, राजेश चौधरी, रवि चौधरी, रवी पाटील, सखाराम माळी, अनिल चौधरी, बशीर खान, गोविंदा गांवडे, ऋषीकेश कोलते, सचिन पाटील, नीळकंठ पाटील, दशरथ शिंपी, अमजद खान, रईस शेख, अमोल चौधरी, विजू चौधरी, भास्कार बारी, भिमा गव्हाळे, निवृत्ती शिवराणे, ज्ञानेश्वर चौधरी आदी उपस्थित होते.



