उपग्रहामुळे मानवाच्या प्रगतीला चालना : सुनील वानखेडे


वरणगाव : गेल्या दोन दशकातील मानवाच्या प्रगतीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. अवकाशामध्ये सोडण्यात आलेल्या उपग्रहाच्या माध्यमातून हवी ती माहिती एका क्लिकवर मिळत आहे. गुगल मॅप, यूट्यूब गुगल सर्च इंजिन यासारखी प्रणाली आपल्याला मिळाली आहे यामुळेच आता समुद्रापलीकडे असलेल्या आप्तेष्टांसोबत सहजगत्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बोलता येते तर जगाच्या कानाकोपर्‍यात कुठेही कोणतीही घटना घडली तर ती आपल्यापर्यंत सहजगत्या पोहोचते यामध्ये महत्त्वाचा वाटा असेल तर तो अंतराळात असलेल्या उपग्रहांचा मानवाने आता इतर ग्रहावर देखील सजीव सृष्टी आहे का त्याचा शोध सुरू असल्याचे प्रतिपादन सुनील वानखेडे यांनी केले.

महात्मा गांधी विद्यालयात कार्यक्रम
4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर हा जागतिक अंतराळ सप्ताह म्हणून संपूर्ण विश्वात साजरा केला जात आहे त्या निमित्ताने महात्मा गांधी विद्यालयात विक्रम साराभाई इनोव्हेशन सायन्स सेंटर, कलाम चिल्ड्रन सायन्स सेंटर व एपीजे अब्दुल कलाम विपनेट क्लब यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका वंदना चव्हाण, उपमुख्याध्यापिका रूपा कुलकर्णी, पर्यवेक्षक पी.जे.पाटील, बी.एम.राठोड आदी उपस्थित उपस्थित होते. मी वैज्ञानिक बोलतो अंतराळ विषयी निबंध, चित्रकला स्पर्धा, नासा इसरो या संस्थांची माहिती या सप्ताहमध्ये विद्यार्थ्यांना करून दिली जात आहे. सूत्रसंचालन एच.एस.पाटील यांनी तर आभार एस.एन.मोरे यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !