यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात
यावल : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार शरद चंद्रजी पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यात यावल कॉलेजच्या चौघा विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक पटकावून प्रथम बक्षीस पटकावले.
यावलमध्ये मॅरेथॉन स्पर्धा
गुरुवारी सकाळी नऊ वाजता यावल कॉलेजच्या प्रांगणात भव्य मॅरेथॉन स्पर्धा यावल कॉलेज व असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा आयोजित करण्यात आली. पाचवी ते सातवी मुला-मुलींचे पहिल्या गटात या स्पर्धेत तीन किलो मीटर धावणे या स्पर्धेत मुलींमध्ये सानेगुरुजी उच्च माध्यमिक विद्यालयातील पौर्णिमा महेश पाटील प्रथम तर द्वितीय पूजा योगेश कोळी मुलींचे विकास विद्यालय, यावल तर मुलांमधून डॉ.जाकिर हुसेन हायस्कूलचे प्रथम शेख मोहम्मद शेख इस्माईल तर द्वितीय शे.आवेश शेख अकील यांनी क्रमांक पटकावला. आठवी ते दहावी मुलांच्या गटात सानेगुरुजी विद्यालयाची भाग्यश्री दिलीप वसावे हिने प्रथम तर द्वितीय दिना मानसिंग वसावे आणि मुलांमधून हितेश मानसिंग बारेला सानेगुरुजी विद्यालय तर बाल संस्कार मधील भूषण कांतिलाल कुंभार यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. अकरावी ते तृतीय वर्ष कॉलेज मुला-मुलींमधून मुलांमधून सहा किलोमीटर धावणे या स्पर्धेत विशाल संजय कुंभार व दीपक संजय कुंभार, यावल कॉलेज या दोघा बंधूंनी प्रथम व दुसरा क्रमांक पटकावला. मुलींमधून पाच किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत यावल कॉलेजची नवी इमजा वळवी व द्वितीय यावल कॉलेजची सहाराने नंबर पटकावला. या स्पर्धा यावल कॉलेज ते सांगवी पर्यंत धावणे या मुख्य रस्त्यावर घेण्यात आल्या



विजेत्यांना बक्षिसाचे वाटप
या विजेत्यांमध्ये प्रथम बक्षीस विजेत्यांना स्मृतीचिन्ह 501 रुपये प्रमाणपत्र तर द्वितीयेला स्मृतीचिन्ह व 251 रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस श्रीराम फाउंडेशनचे श्रीराम पाटील, जयवंतराव येवले, प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, सुखदेव बोदळे यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सातशे विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला होता या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना श्रीराम फाउंडेशन तर्फे प्रशस्तीपत्र व टी शर्ट देण्यात आले. उद्घाटन रावेर येथील श्रीराम फाऊंडेशनचे संचालक श्रीराम पाटील, यावल कॉलेजच्या प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे, माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे, प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते, गिरधर पाटील, सीताराम पाटील, विजय पाटील, प्रा.अर्जुन पाटील, एम.बी.तडवी, सुखदेव बोदडे, अ.सईदभाई, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे, माजी आमदार रमेश चौधरी, भगतसिंग पाटील, नगरसेवक रसूल मेंबर, समीर मोमिन, साने गुरुजी यावल कॉलेजचे मुख्याध्यापक वाघ, डॉ.जाकिर हुसेन हायस्कूलचे प्राचार्य रहिम रजा सर, यांच्या हस्ते स्पर्धेच्या वेळी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यावल, डॉक्टर झाकीर हुसेन हायस्कूल, सानेगुरुजी विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय, बालसंस्कार विद्यालय, विकास विद्यालया व या शिक्षण संस्थांनी भाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले यांच्यातर्फे करण्यात आले. परीक्षक म्हणून के.आर.सोनवणे, पी.डी.सुरवाडे, प्रा.अनिल सोनवणे, प्रा.सी.के.पाटील, डी.आर.देशमुख, जी.बी.पाटील, एम.आर.खेडकर, भूषण नगरे, ठाकरे मॅडम, मीनाक्षी पाटील, मंदवाडे यांनी काम पाहिले.
यांनी घेतले परीश्रम
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.हेमंत येवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष देवकांत पाटील, महिला राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष द्वारकाबाई पाटील, सुरेखा पारधे, राज कोळी, अमोल दुसाने, अरुण लोखंडे, प्रशांत पाटील, निलेश बेलदार, अनिल कोळी, किशोर माळी, नरेंद्र शिंदे, हरी भंडारी, दीपक जोशी, गणी खान अयुब जनाब, बापू जासूद, अन्वर खाटीक, विनोद पाटील, राकेश सोनार, निवृत्ती धांडे, अॅड.निवृत्ती पाटील यांच्यासह यावेळी पोलिस स्टेशनचे पोलीस स्टॉप व होमगार्ड पथकाने सहकार्य केले.
