किनगावातून चोरट्यांनी दुचाकी लांवबली


यावल : तालुक्यातील किनगाव येथे बाजाराकरीता आलेल्या चिंचोली येथील तरुणाची दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबवली.

यावल पोलिसात गुन्हा
चिंचोली गावातील देवेंद्र अशोक साळुंखे हा तरुण दुचाकी (क्रमांक एम. एच.19 बी.के. 1239) घेऊन किनगाव येथील बाजारासाठी आला होता. बाजारात जाण्यापूर्वी त्याने दुचाकी गावातील बाजीराव नगरात असलेल्या भारतीय स्टेट बँके शाखेच्या मागील बाजूस लावली व तो बाजारात गेला. बाजार झाल्यावर जेव्हा तो परत आला तेव्हा जागेवर दुचाकी नव्हती. यावल पोलिस ठाण्यात अशोक साळुंखे यांनी धाव घेत दुचाकी चोरीची तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार रवींद्र पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !