Muktainagarat Gharawar Dagdfake, Marhan : Conflicting Crimes मुक्ताईनगरात घरावर दगडफेक, मारहाण : परस्पराविरोधी गुन्हे

मुक्ताईनगरात पुन्हा राजकीय संघर्ष : एक गटाची घरावर दगडफेक केल्याची तर दुसर्‍या गटाची शिविगाळ करून मारहाणीची तक्रार


Muktainagarat Gharawar Dagdfake, Marhan : Conflicting Crimes भुसावळ : दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान एका गटाने घरासह दुकानावर दगडफेक केल्याने चार संशयीतांसह 15 अज्ञातांविरोधात तर जमावबंदी आदेशाचे उल्लंघण करीत मारहाण केल्याने दुसर्‍या गटाच्या चौघांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, राज्यातील शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला असताना शहरातील नेत्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने शहरातील राजकीय आखाडा चांगलाच तापल्याचे चित्र आहे.

घरासह दुकानावर दगडफेक केल्याचा आरोप
पहिली तक्रार भाग्यश्री अजय जैन (33, बसस्थानकासमोर, मुक्ताईनगर) यांनी दिली आहे. तक्रारीचा आशय असा की, 10 रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्या आपल्या कुटुंबियांसह देवी विसर्जन मिरवणूक पाहत असताना संशयीत आरोपी व होमगार्ड विकास जुमळे, बाळा सुभाष चिंचोले, राजेंद्र सुखदेव हिवराळे, तानाजी वसंत पाटील व अज्ञात 10 ते 15 संशयीतांनी फटाके फोडले तसेच गैरकायद्याची मंडळी जमवून घरासह दुकानावर दगडफेक केल्याने काचा फुटल्या.

दुसर्‍या गटाचा मारहाणीचा आरोप : आठ संशयीतांविरोधात गुन्हा
दुसर्‍या गटातर्फे बाळा सुभाष चिंचोले (धनगरवाडा, मुक्ताईनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अजय अनिल जैन, अमर अनिल जैन, आनंद अनिल जैन, अनिल जैन (पूर्ण नाव माहित नाही) तसेच अन्य चार अनोळखींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिविगाळ करीत मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच जमावबंदी कायद्याचे उल्लंघण केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास हवालदार मोहम्मद तडवी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !