भुसावळ शहरातील 55 वर्षीय प्रौढाची गळफास घेत आत्महत्या
A 55-year-old man committed suicide by hanging himself in Bhusawal भुसावळ : शहरातील मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरातील 55 वर्षीय प्रौढाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी सहावाजेपूर्वी घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. संजय रामदास पारधे (55) असे मयताचे नाव आहे.
बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
भुसवळ शहरातील मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरातील संजय रामदास पारधे यांनी राहत्या घरात बुधवारी रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास राहत्या घरात आत्महत्या केली. राजेंद्र पारधे यांनी त्यांचे मोठे बंधू संजय पारधे यांना बुधवारी सकाळी आवाज दिला मात्र त्यांनी दार उघडले नसल्याने घरात डोकावून पाहिल्यानंतर पारधे यांनी घरातील लोखंडी अँगलला हिरवी दोरी बांधून आत्महत्या केल्याची उघड झाले. बाजारपेठ पोलिस ठाण्यात राजेंद्र पारधे यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. तपास हवालदार सुनील जोशी करीत आहे.
