मध्यप्रदेशातील अल्पवयीन मुलाचा खेडगाव नंदीचे गावातील नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू


A minor boy in Madhya Pradesh drowned in the village Nandi village पाचोरा : पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील नदीपात्रात मध्यप्रदेशातील तिक्या आखाडे (16, उपडी, ता.सेगांव, जि.खरगोन, मध्यप्रदेश) हा मुलाचा बेडाल्याने मृत्यू झाला. तिक्या हा युवक शेत मजुरी करण्यासाठी आपल्या परिवारा सोबत खेडगाव (नंदीचे) ता. पाचोरा येथे आला होता.

नदीपात्र ओलांडताना दुर्घटना
मंगळवार, 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी तिक्या आखाडे हा नदी पात्र ओलांडत असतांना अचानक त्याचा पाय घसरला व तो खोल पाण्यात पडला. हा प्रकार त्याचे सोबत असलेल्या मुलांनी घराच्या मंडळींना व परिवारास सांगितल्यानंतर तिक्या आखाडे याचा शोध सुरू झाला. मात्र काही वेळात अंधार पडल्याने शोध कार्यास अडथळा निर्माण होवु लागला.

अखेर मृतदेहच आढळला
गुरुवार, 12 ऑक्टोबर रोजी पहाटेच पुन्हा शोध कार्य सुरू झाले असता सकाळी 8 वाजेच्या सुमारास तिक्या आखाडे याचा मृतदेह आढळून आला. पाचोरा ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी तिक्या आखाडे यास मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित सांळुखे यांनी केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !