रावेर शहरात घरफोडी : 58 हजारांचा ऐवज लंपास


Burglary in Raver city: 58 thousand in lieu of compensation रावेर : शहरातील जीआयएस कॉलनी भागातील तडवी कॉलनीत बंद घरातून चोरट्यांनी 58 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
तक्रारदार शाम दिनकर तायडे (35) हे व्यापारी असून तडवी कॉलनीत वास्तव्याला आहेत. 8 ते 9 दरम्यान ते गावाला गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत मागील दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील 50 हजारांची रोकड, पाच हजार रुपये किंमतीचा रेड मी मोबाईल, तीन हजार रुपये किंमतीचे व दोन ग्रॅम वजनाचे टॉप्स मिळून एकूण 58 हजारांचा ऐवज लांबवला. शाम तायडे यांनी या प्रकरणी रावेर पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !