स्वस्तात सोन्याचे कॉईन देण्याच्या नावाखाली साडेनऊ लाखात गंडवले : मुक्ताईनगर तालुक्यातील घटना


मुक्ताईनगर : स्वस्तात सोन्याचे कॉईन देण्याच्या नावाखाली नागपूरातील एकाची साडेनऊ लाखात फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी चौघांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सोन्याचे कॉइन म्हणून दिले पितळी धातू
तक्रारदार दिनेश दत्तुजी भोंगडे (34, नागपूर) यांना संशयीत कृणाल किशोर मुलमुल (नागपूर) व त्याच्या तीन साथीदारांनी सोन्याचा एक खरा कॉईन दाखवून अन्य कॉईन स्वस्तात देण्याचे आमिष दाखवले. ठरल्यानंतर भोंगडे हे ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते एक दरम्यान पूर्णाड फाट्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील डोलारखेडा रस्त्यावर आल्यानंतर संशयीतांनी साडेनऊ लाखांची रक्कम स्वीकारून भोंगडे यांना 400 कॉईन दिले मात्र त्याची नंतर तपासणी केल्यानंतर ते पिवळ्या धातूचे नकली कॉईन निघाले.

चौकडी विरोधात गुन्हा दाखल
फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर शुक्रवारी भोंगडे यांच्या तक्रारीनंतर कृणाल किशोर मुलमुल (नागपूर) व तीन अन्य साथीदारांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल बोरकर करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !