काही दिवसांवर आले होते लग्न : अंजाळे गावातील २३ वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या
यावल : तालुक्यातील अंजाळे गावातील लग्न घटकाजवळ आलेल्या तरूणी आपल्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केली. याबाबत यावल पोलीस स्टेशनमध्ये अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली. मीनल निवृत्ती भागवत (२३, नवीन प्लाट क्षेत्र, अंजाळे) असे मयत तरुणीचे नाव आहे.
गळफास घेत केली आत्महत्या
या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली सविस्तर माहिती अशी की , मिनल निवृत्ती भागवत या तरुणीने शनिवारी, १५ आक्टोबर २o२२ रोजी सकाळी १o वाजेच्या पुर्वी आपल्या राहत्या घरातील छ्ताच्या लोखंडी पाईपला ओढणीने गळफास घेवुन आत्महत्या केली याबाबत मयत तरूणीचे वडील निवृत्ती किसन भागवत (५८) यांनी खबर दिल्याने यावल पोलीस स्टेशनमध्ये अ.मृ .र ६५ / २०२२ प्रमाणे अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप सुर्यवंशी करीत आहे.

आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ट
आत्महत्या केलेल्या तरुणीचे लग्न जुळले होते व विवाह दिवाळीनंतर होणार होता, अशी माहिती मिळत आहे त्यामुळे विवाहाची वेळ जवळ आली असता तरुणीने आत्महत्या का केली असावी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान मयत तरूणीच्या मृतदेहाचे यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश पवन जैन यांनी केले.