दारूच्या नशेत अल्पवयीन मुलीची छेडखानी : आरोपीला अटक


Drunk Molestation of Minor Giirl : Accused Arrested

जळगाव : जळगाव एमआयडीसी पोलिसांनी अल्पवयीन मुलीची छेडखानी करणार्‍या तबरेज ऊर्फ अच्छु ईब्राहीम शेख (तारगल्ली, तांबापुरा, जळगाव) यास बेड्या ठोकल्या आहेत.

दारूच्या नशेत केली छेडखानी
इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणारी तांबापुरा भागात राहणारी मुलगी 13 ऑक्टोबर रोजी सकाळी अंगणात झाडू मारत असताना संशयीत तबरेज हा दारुच्या नशेत तिच्याजवळ आल्यानंतर आरोपीने मुलीची छेड काढली. मुलगी ओरडल्यानंतर आजूबाजूचे लोक घटनास्थळी धावत आले व त्यांनी तिची तबरेजच्या तावडीतून सुटका केली. दरम्यान तबरेज पळून गेला होता. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यांनी आवळल्या मुसक्या
पोलिस हेड कॉन्स्टेबल अल्ताफ पठाण, किशोर पाटील यांनी रविवारी आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक रवींद्र गिरासे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !