भुसावळातील छायाचित्रकार राजेंद्र जावळे यांचा सन्मान


भुसावळ : शहरातील छायाचित्रकार राजेंद्र जावळे यांनी तापी नदीच्या किनार्‍यावर सूर्योदयाचे सुंदर असे छायाचित्र आपल्या कॅमेर्‍यातून टिपल्यानंतर या छायाचित्राला औरंगाबाद येथील राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे. या छायाचित्रकाराला स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आल्याची दखल भुसावळातील वरीष्ठ छायाचित्रकारांनी घेत जावळे यांचे अभिनंदन केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी अविनाश साळी, गोकुळ महाजन, श्याम गोविंदा, गणेश राठोड, भरत शिंपी आदी छायाचित्रकार उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !