मालदाभाडी गावातील बंद घरातून 70 हजारांचा ऐवज लांबवला


A Compensation of 70 thousand was extended from a Closed house in Maldabhadi Village जामनेर : तालुक्यातील मालदाभाडी येथील महिलेच्या बंद घरातून भर दिवसा चोरट्यांनी 70 हजारांचे दागिने व रोकड लांबवली. या प्रकरणी जामनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.

भर दिवसा झाली चोरी
जामनेर तालुक्यातील मालदाभाडी येथे लिलाबाई सुपडू चौधरी (42) या वास्तव्यास आहेत. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ ते दुपारी दोन दरम्यान अज्ञात चोरट्यांनी 60 हजार रुपये किंमतीचे व पाच ग्रॅम वजनाचे टोंगल तसेच दहा हजारांची रोकड लांबवली. या प्रकरणी जामनेर पोलीस स्थानकात अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय संजय पाटील करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !