पिंप्रीनांदू पूल आणि खामखेडा पूल अंतुर्ली परीसरासाठी मोठी उपलब्धी : अॅड.रोहिणी खडसे
जनसंवाद यात्रेदरम्यान ग्रामस्थांशी साधला संवाद
मुक्ताईनगर : नाथाभाऊंच्या दूरदृष्टीने उभारलेला खामखेडा पूल सुद्धा अंतुर्ली परीरासाठी खूप महत्वाचा ठरला असून शसकीय कामकाजासाठी नागरीकांना मुक्ताईनगरला येण्या- जाण्यासाठीचा फेरा कमी झाल्याने वेळ आणि पैशाची बचत होण्यास मदत होत आहे. या पुलांसह बोदवड तालुका निर्मिती, मुक्ताईनगर नामकरण सोहळा आदी ऐतिहासिक कामांची इतिहासाला नोंद घ्यावीच लागेल तसेच निंभोरासीम-पिंप्रीनांदू पूल ही अंतुर्ली परीसरासाठी फार मोठी उपलब्धी असल्याचे मत अॅड.रोहिणी खडसे यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या विसाव्या दिवशी रोहिणी खडसे-खेवलकर यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील बेलखेड, भोकरी, धामणदे, नरवेल येथील ग्रामस्थांशी संवाद साधला.
यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, जिल्हा सरचिटणीस तथा यात्रा प्रमुख ईश्वर रहाणे, सोपान पाटील, विलास धायडे, किशोर चौधरी, प्रदीप साळुंखे, पवन पाटील, विजय सोनार, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, सुधीर तराळ, सोपान दुट्टे, रामभाऊ पाटील, मुळाभाऊ पाटील, भाऊलाल पाटील, गणेश तराळ, बाळा भालशंकर, ग्रामस्थ उपस्थित होते.
