जळगावात माथेफिरूने दोन कार जाळल्या


Mathefiru burnt two cars in Jalgaon जळगाव : जळगाव शहरातील रामदास कॉलनीत विकृताने मंगळवार, 18 रोजी मध्यरात्री दोन कार पेटवल्याची बाब घडली असून या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळी उघडकीस आली घटना
शहरातील रामदास कॉलनीत यश जतीन गांधी हे वास्तव्यास आहेत. ते खाजगी व्यावसायीक असून त्यांच्याकडे कार (एम.एच.19 सी.यू.7348) असून सोमवार, 17 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घराच्या कुंपणातील कारला मधरात्री माथेफिरुंनी आग लावली. यश गांधी यांच्या आई पहाटे तीन वाजेच्या सुमारास पाणी पिण्यासाठी उठल्या असता त्यांना कार जळतांना दिसून आली. त्यांनी आपल्याला मुलाला उठवत घटनेची माहिती दिली. त्यांनी तात्काळ पाण्याचा मारा करीत आग विझविली.

प्रभात कॉलनीतही पेटवली कार
माथेफिरुंनी प्रभात कॉलनीत राहणारे महिपाल बोहरा यांची कार (एम.एच.19 सी.यू.1939) देखील पेटवल्याचे उघड झाले आहे. मंगळवार, 18 ऑक्टोबर रोजी दुपारी यश गांधी यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !