Rape of young woman in Jalgaon taluka : Crime against young man of Bhadli जळगाव तालुक्यातील तरुणीवर बलात्कार : भादलीच्या तरुणाविरोधात गुन्हा
Rape of young woman in Jalgaon taluka : Crime against young man of Bhadli जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एका गावातील 27 वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार करण्यात आला तसेच फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देण्यात आल्याप्रकरणी तरुणाविरोधात जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अत्याचारातून पीडीता गर्भवती
जिल्ह्यातील एका गावातील 27 वर्षीय तरुणीशी संशयीत आरोपी गणेश निवृत्ती सकपाळे (भादली, ह.मु.पुणे) याने ओळख वाढवल्यानंतर जिल्ह्यातील एका गावातील पीडीतेच्या मैत्रीणीकडे तसेच पुणे येथे नेत वारंवार अत्याचार करण्यात आला. ही घटना 9 फेब्रुवारी 2022 ते 25 मे 2022 दरम्यान ठिकठिकाणी अत्याचार करण्यात आला. त्यातून पीडीता गर्भवती राहिल्याने पुण्यातील सिव्हील हॉस्पिटलमध्ये पीडीतेचा गर्भपात करण्यात आला. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर संशयीत गणेश सपकाळे विरोधात जळगावातील एमआयडीसी पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक अंनिस शेख करीत आहेत.
