A wire of two thousand was extended by breaking the car from Pimprisecum Shivar पिंप्रीसेकम शिवारातून मोटारी फोडत दोन हजारांची तार लांबवली
A wire of two thousand was extended by breaking the car from Pimprisecum Shivar भुसावळ : भूरट्या चोरट्यांनी पिंप्रीसेकम शिवारातील शेतातून इलेक्ट्रीक मोटारी फोडून त्यातील दोन हजार रुपये किंमतीची कॉपर वायर लांबवल्याने शेतकर्याला फटका बसला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरट्यांचा मोर्चा शेत शिवाराकडे
पिंप्रीसेकम येथील पंकज किसन वारके यांचे पिंप्रीसेकम शिवारातील तापी नदीकाठी शेत आहे. चोरट्यांनी बुधवारी सकाळी आठ वाजेपूर्वी शेतातील इलेक्ट्रीक पंप फोडून त्यातील दोन हजार रुपये किंमतीची वायर लांबवली. तपास नाईक योगेश पालवे करीत आहेत.
