जळगाव-हैद्राबाद एक्स्प्रेसमधून परप्रांतीय प्रवाशाचा मोबाईल लांबवला : जळगाव रेल्वे स्थानकावरील घटना
Foreign passenger’s mobile stolen from Jalgaon-Hyderabad Express : Incident at Jalgaon railway station भुसावळ : ट्रेन क्रमांक 17091 जयपूर-हैद्राबाद एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक एस- 3 मधून प्रवास करणार्या मोहम्मद शरीफ युसूफ (25, आंबेडकर कॉलनी टप्पा, चबुतरा, न्यू पोलीस स्टेशन समोर, मेहंदी पट्टणम, हैद्राबाद) यांचा 40 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जळगाव स्थानक सुटताच तीन भामट्यांनी लांबवला.
भुसावळात गुन्हा वर्ग
मनमाड येथून भुसावळात हा गुन्हा वर्ग करण्यात आला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयीतांचा शोध सुरू केला आहे. तपास फौजदार राजेंद्र पाटील करीत आहेत.
