मुक्ताईनगरातून महिलेचे 65 हजारांचे मंगळसूत्र लांबवले
Mangalsutra of Woman Worth 65 Thousand was extended from Muktainagar मुक्ताईनगर : शहरातील सरदार वल्लभभाई पटेल नगरातील महिलेच्या घराची खिडकी उघडून चोरट्यांनी पर्स लांबवली. या पर्समध्ये सुमारे 65 हजारांचे दागिणे होते. ही घटना 19 रोजी रात्री ते 20 रोजीच्या पहाटेदरम्यान घडली.
खिडकी उघडून लांबवली पर्स
व्यापारी कमलेश जयकुमार जैन (सरदार वल्लभभाई पटेल नगर, प्लॉट क्रमांक 152, मुक्ताईनगर) हे कुटुंबास वास्तव्यास आहेत. जैन यांच्या पत्नीची पर्स खिडकीत ठेवण्यात आली होती मात्र चोरट्यांनी संधी साधत खिडकी उघडून पर्स लांबवली. या पर्समध्ये पाच हजारांची रोकड व 60 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र होते. तपास हवालदा महंमद तडवी करीत आहेत.
