बिहारी मजुरावर क्रुर काळाचा घाला : बस-ट्रक अपघातात 14 मजुर जागीच ठार


Cruel attack on Bihari laborers : 14 laborers killed on the spot in bus-truck Accident भोपाळ : प्रवाशांना घेवून जाणार्‍या बस व ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात बसमधील 14 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील रीवा येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. अपघात नेमका कसा घडला याबाबत अस्पष्टता असून ब्रेक न लागल्याने वाहने धडकल्याची माहिती आहे. या अपघात 40 पेक्षा अधिक मजूर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.





साखर झोपेत मजूर असताना अपघात
हैदराबादहून लखनौला जात असलेलय बसमध्ये 100 हून अधिक प्रवासी होते आणि मृतांपैकी बहुतांश उत्तर प्रदेश आणि बिहारमधील रहिवासी असून या अपघातात 40 हून अधिक जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेवर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शोक व्यक्त केला.

ब्रेक न लागल्याने अपघात
ब्रेक न लागल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर अनेक जण बसमध्ये अडकले, मात्र पोलिस-प्रशासनाच्या तत्परतेमुळे त्यांना बाहेर काढण्यात आले. या अपघातात अनेकांचे हात पाय कापले गेले आहेत. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिसर्‍या वाहनाची माहिती अद्याप समोर आलेली नाही. बस-ट्रक घटनास्थळी आहे, मात्र तिसरे वाहन फरार आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !