जळगावातील तरुणीचे बनावट अश्लील फोटो व्हायरलची धमकी देत मागितली खंडणी


Ransom demanded by threatening fake pornographic photo of girl in Jalgaon जळगाव : शहरातील एका भागातील रहिवासी व मूळची पिंपरीतील रहिवासी असलेल्या 26 वर्षीय तरुणीच्या फोटोला बनावट अश्लील चेहरा लावून ते व्हायरलची धमकी देत खंडणी मागण्यात आली तसेच तक्रारदार तरुणीच्या दौन मैत्रिणींनादेखील हे फोटो पाठवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
शिक्षण घेणार्‍या 26 वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 15 ते 21 2022 ऑक्टोंबर दरम्यान अज्ञात इसमाने त्याच्या व्हॉटसअ‍ॅप मोबाईल क्रमांक +8801408-372865. +8801614-690909 वरुन तरुणीचा चेहरा असलेल्या फोटोला अश्लील फोटो सोबत एडीट केला. त्यानंतर ते बनावट अश्लिल फोटो पीडीत तरुणीच्या दोन मैत्रीणींना पाठवले. तसेच ते फोटो अधिक व्हायरल न करण्यासाठी पैशांची मागणी केली. शेवटी तरुणीने जळगाव सायबर पोलिसात दिल्याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !