हतनूर येथील नवजात अर्भकाचा उपचारादरम्यान मृत्यू
Death of newborn in Hatnoor during treatment भुसावळ : तालुक्यातील हतनूर गावातील शिवम भारत गायकवाड (एक महिना) या बालकावर प्रकृती अस्वास्थामुळे रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र बालकाची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यास भुसावळ ट्रामा सेंटरमध्ये दाखल केले असता उपचार सुरू असताना बाळाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार, 27 रोजी घडली.
वरणगाव पोलिसात नोंद
या प्रकरणी वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक प्रमोद कंखरे करीत आहेत.
