Youth’s dreams shattered : Suspension of police recruitment in the state युवकांच्या स्वप्नांवर फेरले पाणी : राज्यातील पोलिस भरतीला स्थगिती
Youth’s dreams shattered : Suspension of police recruitment in the state मुंबई : राज्यभरात तब्बल 14 हजार 956 पदांसाठी भरती होणार असल्याने राज्यातील युवकांमध्ये आनंदाचे वातावरण होते शिवाय तरुणांनी तयारीला देखील वेग दिला होता मात्र आता भरतीवर स्थगिती आल्यामुळे ही भरती पुन्हा लांबणीवर पडली आहे. या भरतीच्या स्थगितीचे कारण समजले नसले तरी पुढील आठवड्यात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने नोव्हेंबरमध्ये होणा-या पोलीस भरतीला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिल्यामुळे भरतीची तयारी करणार्या विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.
भरतीकडे लागले युवकांचे लक्ष
गेल्या तीन वर्षांमध्ये पोलीस भरती झालेली नसल्यामुळे अनेक तरुण वयोमर्यादेमध्ये बसत नाही. त्यामुळे भरतीसाठी वयोमर्यादा वाढवावी अशी मागणी आहे त्यामुळे याबाबत विचार सुरु असल्याचे बोलले जात आहे. ही भरती 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार होती. पण आता ती केव्हा होईल? याकडे लक्ष लागले आहे.



