दिराशी होते प्रेमसंबंध : पतीचा काटा काढत दिड वर्ष घरातच लपवला मृतदेह मात्र घडले असे काही….


Had an affair with Dir : She hid her husband’s body in the house for one and a half years, but something happened….

नवी दिल्ली : दिराशी प्रेमसंबंध ठेवत पत्नीने पतीचा चौघांच्या मदतीने काटा काढला तसेच दिड वर्ष प्रकरणाचा उलगडा न होण्यासाठी मृतदेह दिड वर्ष घरातच लपवून ठेवण्यात आला मात्र मृतदेहाचे अवशेष जंगलात फेकल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. या प्रकरणी पत्नीसह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यातील उमरी गावात ही थरकाप उडवणारी घटना घडली.





पतीला विष देवून केले ठार
विवाहितेने आपल्या दीर आणि काक सासर्‍याच्या मदतीने पतीला विष देऊन ठार केले आणि नंतर पतीचे शीर धडापासून वेगळे केले. यानंतर दीड वर्षे पतीचा मृतदेह घरातच भुश्याच्या ढिगार्‍यात लपवून ठेवला. दीड वर्षानंतर पतीचा सांगाडा जंगलात फेकला मात्र त्यानंतर खुनाचा प्रकार उघडकीस आला.

नेमकं काय घडलं?
जंगलात सांगाडा सापडल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि पतीच्या हत्येप्रकरणी महिलेसह चार आरोपींना ताब्यात घेतले. सध्या दोन आरोपींचा शोध सुरू आहे. 40 वर्षीय रामसुशील पाल यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला होता. यानंतर त्यांनी बिटोल उर्फ रंजना पाल नावाच्या महिलेसोबत दुसरे लग्न केले. लग्नाच्या दोन वर्षानंतर रंजनाचे दीर गुलाब पालसोबत प्रेमसंबंध जुळले.

दिड वर्षानंतर प्रकरणाचा उलगडा
प्रेमप्रकरणाची माहिती लागताच रामसुशील आणि रंजना, यांच्यात भांडणे सुरू झाली. यानंतर रंजना आणि गुलाबने रामसुशीलची हत्या करण्याची योजना आखली. रामसुशीलची हत्या केल्यानंतर, त्याची संपत्ती हडपण्याची योजना होती. यात रामसुशीलची पत्नी रंजना आणि भाऊ गुलाबने, दुसरा भाऊ अंजनी पाल आणि काका रामपती पालसह, इतर दोघांना सामील केले. अखेर दीड वर्षानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !