मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य व्हायरल : सहाय्यक उपनिरीक्षक महाजनचा जामीन फेटाळला
Offensive remarks about Maratha community go viral : Assistant Sub-Inspector Mahajan’s Bail Rejected जळगाव : मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी केल्यानंतर ती क्लीप गुन्हे शाखेचे कर्मचारी व तत्कालीन सहाय्यक उपनिरीक्षक अशोक महाजन यांनी व्हायरल केली होती. या प्रकरणी दोघांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर महाजन यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अज केला होता मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
महाजन यांनीच केली क्लीप व्हायरल
तत्कालीन पोलिस निरीक्षक बकाले यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान आक्षेपार्ह वक्तव्याची क्लीप महाजन यांच्याच मोबाईलमधून व्हायरल झाल्याचे समोर आले असून सुरूवातीला महाजन यांना या गुन्ह्यात साक्षीदार व नंतर आरोपी करण्यात आले आहे. महाजन यांनी मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार दिली असलीतरी हा मोबाईल जप्त झाल्यानंतरच गुन्ह्याचा तपास पुढे सरकणार आहे त्यामुळे सुरूवातीला महाजन यांना अटक करणे गरजेचे असल्याचा युक्तीवाद सरकार पक्षाने केल्यानंतर त्याचे आधारे महाजनांचा जामीन फेटाळण्यात आला आहे. सरकार पक्षातर्फे अॅड.पंढरीनाथ चौधरी यांनी काम पाहिले.


यंत्रणेला आरोपी गवसेनात
मराठा समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यात अधिकार्यांविषयी संतापाची लाट पसरली आहे. अनेक जुन्या गुन्ह्यातील आरोपी यंत्रणेला गवसत असताना या गंभीर प्रकरणातील संशयीत अद्याप कसे सापडत नाहीत? असा प्रश्नही नागरीक आता विचारू लागले आहे. नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रामकुमार यांनी दखल घेवून या प्रकरणात लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.