भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती उत्साहात


भुसावळ (शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2026) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालय परिसरात व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले,

राष्ट्रपुरूषांच्या प्रतिमेचे पूजन
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांच्याहस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी महात्मा गांधी यांच्या स्वच्छतेच्या विचारांचा दैनंदिन जीवनात अंगीकार करून प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला पाहिजे व लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रप्रेमातून विद्यार्थ्यांनी आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.

यांची होती उपस्थिती
रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.संगीता धर्माधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. ए.आर.सावळे, विद्यार्थी विकास विभागप्रमुख प्रा.डॉ.एस.डी.चौधरी, माजी प्रा.डॉ.डी.एस.राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !