भुसावळात कार्तिकी एकादशीनिमित्त दिंडीचे बागुल परीवारातर्फे स्वागत


भुसावळ : कार्तिकी एकादशी देवशयनी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल मंदिर वॉर्ड भागातील विठ्ठल मंदिरातील वारकरी संप्रदायातर्फे काढण्यात आलेल्या दिंडीचे बागुल परीवारातर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी अनिल बागुल यांनी पुष्पहार घालून पंचारती औक्षण करीत दिंडीतील वारकर्‍यांचे स्वागत केले .

वारकर्‍यांना हरीपाठाचे पुस्तक भेट
दिंडीतील सहभागी वारकरी यांना 90 वर्षीय पुष्पावती बबनराव बागुल यांच्याहस्ते श्रीहरीपाठ पुस्तिका व प्रसाद वाटप करण्यात आला. शतकाकडे वाटचाल करणार्‍या दिंडी स्वागताची पारंपरिक धार्मिक रूढी जपून आजही दिंडी स्वागताची परंपरा बागुल कुटुंब जोपासत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !